Uncategorized

भोईंजे गावच्या पोलीस पाटील ललिता मुसळे ठरल्या बार्शी तालुक्यात ‘बेस्ट पोलीस पाटील.

Oplus_16908288

विविध कामगिरीत मिळवले सर्वाधिक गुण!

• बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून ‘बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर

• समन्स-वॉरंट, बंदोबस्त आणि गुन्हे तपासात पोलिसांना उल्लेखनीय मदत

बार्शी प्रतिनिधी दि. ७ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलांतर्गत बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने दिला जाणारा ऑक्टोबर २०२६ चा ‘बेस्ट पोलीस पाटील ऑफ द मंथ’ (Best Police Patil of the Month) हा मानाचा पुरस्कार भोईंजे गावच्या पोलीस पाटील ललिता बाळू मुसळे यांना जाहीर झाला आहे. कर्तव्यात तत्परता दाखवत विविध प्रशासकीय व कायदा-सुव्यवस्थेच्या कामांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सर्वाधिक गुणांसह त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

​माहे ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ललिता मुसळे यांनी गावात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये प्रामुख्याने न्यायालयाचे समन्स व वॉरंट बजावणे, गावातील अंतर्गत वाद मिटवून शांतता राखणे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवणे, दखलपात्र गुन्ह्यांच्या तपासात पंच उपलब्ध करून देणे, तसेच गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांना मदत करणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. याशिवाय गावातील यात्रा बंदोबस्तादरम्यानही त्यांनी चोख कामगिरी बजावली.

त्यांच्या या सातत्यपूर्ण व जबाबदार कार्याचे मूल्यमापन करून बार्शी तालुका पोलीस ठाण्याकडून त्यांना सर्वाधिक ३३५० गुण देण्यात आले असून, त्या आधारे त्यांची ऑक्टोबर महिन्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून निवड करण्यात आली.

​या उल्लेखनीय यशाबद्दल बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ललिता मुसळे यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल भोईंजे गाव तसेच परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button