Uncategorized

तळवडेत वृद्ध महिलेला बांधून ५३ लाखांचे दागिने लुटणारी टोळी अवघ्या ८ तासांत गजाआड.

oplus_6291456

चिखली पोलिसांची धडक कामगिरी!

​• ७० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी; मुंबई, ठाणे आणि चिखलीतून तिघांना बेड्या

​• तब्बल ७३ तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे पैंजण आणि गुन्ह्यातील दुचाकी जप्त

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. १६ : घराचा दरवाजा तोडून आत घुसून वृद्ध महिलेचे हात-पाय बांधत, तोंडावर साड्या कोंबून व चाकूसह मारहाण करत तब्बल ५३ लाख ७० हजारांचे ७३ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा चिखली पोलिसांनी अवघ्या ८ तासांत पर्दाफाश केला आहे. या थरारक दरोड्याचा छडा लावत पोलिसांनी मुंबई, मुंब्रा आणि चिखली येथून तिघा आरोपींना जेरबंद करून तब्बल ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ​

थरारक घटना: मध्यरात्री दरवाजा तोडून मारहाण करत लुटले​.

मिळालेल्या माहितीनुसार, तळवडे येथील ज्योतीबानगर परिसरात राहणाऱ्या भारती मारुती भालेकर (वय ६०) या १३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १ ते १:१५ वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या असताना, तीन अनोळखी इसमांनी हॉलचे दार तोडून घरात जबरदस्तीने प्रवेश केला. ​

आरोपींनी झोपेत असलेल्या महिलेच्या अंगावर बसून तिचे हात-पाय बांधले, आरडाओरडा करू नये म्हणून तोंडावर साड्या कोंबल्या आणि चाकाचा धाक दाखवत बेदम मारहाण केली. त्यानंतर घरातील ४८ लाख २५ हजार रुपये किमतीचे ६८ तोळे सोन्याचे दागिने, ५ लाख रुपयांची रोकड, ३० हजार रुपयांचे चांदीचे ३ जोड पैंजण, वनप्लस मोबाईल व टायटन घड्याळ असा एकूण ५३ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले होते. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२६(२), ३११, ३३१(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

​तपास चक्रे वेगाने फिरली: ७० हून अधिक सीसीटीव्ही तपासले​गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त परिमंडळ-४ श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण मोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे व तपास पथकाने तात्काळ सूत्रे हलवली. पोलिसांनी घटनास्थळ आणि परिसरातील ७० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले.

​मुंबई-ठाण्यातून आरोपी जेरबंद​ सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम संशयित आरोपी अनारउल्ला मजहरउल्ला चौधरी (वय ३६, रा. सरस्वती स्कूलजवळ, चिखली) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीनंतर उर्वरित दोन साथीदार:

१) ​अब्दुल रहिम मजिद मोमीन (वय ३९, रा. चारकोप, कांदिवली, मुंबई)

२)आणि​समिउल्ला अजमतउल्ला खान (वय ३२, रा. शिलफाटा, मुंब्रा, ठाणे)

या दोघांचा ठावठिकाणा शोधून त्यांना बेड्या ठोकल्या. ​चौकशीत तिन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून अंदाजे ५७ लाख ८७ हजार ४०० रुपयांचे अंदाजे ७३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ३ जोड चांदीचे पैंजण, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

​उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस पथक:​ पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (प्रादेशिक विभाग), अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड (गुन्हे), पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहा. पोलीस आयुक्त प्रवीण मोरे, वपोनि रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल फडतरे, सपोनि सुभाष चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार किरण काटकर, विनोद व्हीनमाने, कंठय्या स्वामी, प्रविण भोमाळे, सुरज सुतार, अरुण साबळे, संतोष पोहवा, किरण भालेराव, अजय गायकवाड, भरत माने, नवनाथ कुल्हे, अनिल राक्षे व संतोष भोर यांनी ही धडक कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button