सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आमदार राजाभाऊ राऊत यांची संचालकपदी बिनविरोध निवड.

सहकार क्षेत्रात जल्लोष!
सोलापूर प्रतिनिधी दि. ३० : सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री राजाभाऊ राऊत यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर बिनविरोध निवड झाली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा मोठा वर्षाव होत असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक नाडीला मिळणार बळ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा मानली जाते. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण भागातील विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी ही बँक महत्त्वाची भूमिका बजावते. आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासारख्या अभ्यासू आणि लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वाखाली बँकेच्या कामकाजाला नवी गती मिळेल आणि सर्वसामान्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे सुटतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.
जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव आमदार राजाभाऊ राऊत यांच्या या बिनविरोध निवडीची बातमी समजताच सहकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत या निवडीचे जोरदार स्वागत केले असून, ही निवड सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे.