Uncategorized

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला मोठे यश.

पिंपरी पालिकेतील कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस व वेतन देण्याचे महापौरांचे आदेश

पिंपरी, दि. २९ ऑक्टोबर (विशेष प्रतिनिधी) : राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर काढण्यात आलेली ‘विनम्र अभियान पदयात्रा’ यशस्वी ठरली आहे. या पदयात्रेनंतर महापौर रवी लांडगे यांनी महापालिकेतील सर्व कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी, म्हणजेच ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी बोनस आणि मासिक वेतन अदा करण्याचे स्पष्ट आदेश प्रशासनाला दिले आहेत.​

भीमसृष्टीतून पदयात्रेला सुरुवात पिंपरी येथील भीमसृष्टीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला प्रारंभ झाला. या पदयात्रेत महापालिकेतील हजारो कामगार व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगारांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

​महापौरांना मागण्यांचे सविस्तर निवेदन पदयात्रा महापालिकेत पोहोचल्यानंतर यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर रवी लांडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने खालील मागण्या करण्यात आल्या:

​• आरोग्य, वैद्यकीय, उद्यान, अग्निशमन, पाणीपुरवठा व शाळांमधील सुमारे ४,५०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ लागू करावे.​

• सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबासह किमान ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा कवच मिळावे.​कामावर असताना अपघाती किंवा आजाराने मृत्यू झाल्यास वारसदारास २५ लाख रुपयांची आर्थिक भरपाई मिळावी.

​• मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर महापालिकेत सेवेत सामावून घेण्यात यावे.

​• २०२५-२६ या वर्षाचा बोनस व चालू महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी म्हणजेच ३ नोव्हेंबरच्या आत जमा करावे.​

महापौरांची सकारात्मक भूमिका व तातडीचे आदेश कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर महापौर रवी लांडगे यांनी कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या लढ्याचे कौतुक केले. बैठकीस उपस्थित असलेले मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांना तातडीने कार्यवाही करून परिपत्रक काढण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.​

“कामगारांच्या हक्कासाठी यशवंतभाऊ आयुष्यभर लढत आले आहेत. पालिकेतील सर्व पात्र कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी बोनस मिळालाच पाहिजे. ठेकेदारांनी बोनस देण्याबाबत कोणतीही पळवाट शोधू नये, यासाठी कडक सूचना दिल्या जातील. उर्वरित धोरणात्मक विषयांवर लवकरच सविस्तर बैठक घेतली जाईल.”— रवी लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

​कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण महापौरांच्या या सकारात्मक भूमिकेबद्दल यशवंतभाऊ भोसले यांनी सर्व कामगारांच्या वतीने त्यांचे आभार मानले. “काही ठेकेदार पगारातच बोनस समाविष्ट असल्याचे सांगून कामगारांची दिशाभूल करतात, अशा ठेकेदारांवर वचक बसवून सर्व पात्र कामगारांना थेट बोनस मिळवून देण्याची भूमिका महापौरांनी घेतली आहे,” असे भोसले यांनी नमूद केले.

​प्रशासनाकडून परिपत्रकाची तयारीमहापौरांच्या आदेशानुसार सर्व संबंधित विभागांतील कंत्राटदारांना कामगारांचा बोनस व वेतन तातडीने देण्याबाबतचे परिपत्रक आज संध्याकाळपर्यंत अथवा सोमवारी सकाळपर्यंत जारी केले जाईल, अशी माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली. प्रशासनाच्या या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कामगारांची दिवाळी आनंदात साजरी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button