कुडूवाडी पहिल्या दिवशी अर्जाच्या प्रतीक्षेत
कुईवाडी : (HRNM)कुईवाडी नगरपरिषदेच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. मात्र उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे व दाखले मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांनी नगरपरिषद कार्यालयात मोठी गर्दी केली.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ऑनलाइन असून, उमेदवारांना त्यांच्या ऑनलाइन दाखल अर्जाची प्रत नगरपरिषद कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी नगरपालिकेच्या निवडणूक विभागाने विशेष व्यवस्था केली असून, नगराध्यक्ष पदाच्या अर्ज स्वीकृतीसाठी एक कर्मचारी तर १० प्रभागांसाठी पाच कर्मचारी नियुक्त केले आहेत. पहिल्या दिवशी ठरवलेल्या वेळेत एकही अर्ज जमा झाला नसला, तरी उमेदवारीसाठी लागणाऱ्या नो ड्युज प्रमाणपत्र, शौचालय दाखला आणि अन्य कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी इच्छुक उमेदवार व त्यांचे अनुमोदक ऑफिसमध्ये दिसून आले.