Uncategorized

महाराष्ट्र मजुर पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार संस्थापक अध्यक्ष :भाऊसाहेब अडागळे

पिंपरी:१९ (एच आर न्यूज मराठी ) पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील देखील बीआरटी प्रकल्प हटवून रस्ते विस्तारित केले पाहिजेत. संथ गतीने सुरू असणाऱ्या मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून तासंतास पुणे नाशिक महामार्ग पुणे मुंबई महामार्गावर प्रवासी अडकून पडत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासह इतर ७ मोठी रुग्णालय चालवत आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वै‌द्यकीय सेपा, सुविधा देण्यासाठी पुरेशी कर्मचारी व अधिकारी उपलब्ध नाहीत. या ठिकाणी सर्वच जागांवर ठेकेदारी पद्धतीने अकुशल कामगार नेमून नागरिकांचा जीव धोक्यात टाकण्याचे पाप प्रशासन करत आहे. या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पैशावर अधिकारी, पुढारी व ठेकेदार स्वतःचे खिसे भरत आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सक्षम वैद्यकीय आरोग्य सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र मजूर पक्षाचे प्रतिनिधी सभागृहात असले पाहिजेत. यासाठी पिंपरी चिंचवड सह पुणे महापालिकेतील सर्व प्रभागात स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे असे भाऊसाहेब अडागळे यांनी सांगितले.निगडी येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा व स्मारक उभारण्यात आली आहे. मेट्रोमुळे त्यास बाधा पोहचत आहे. त्याचप्रमाणे चिंचवड स्टेशन चौकातील लहुजी वस्ताद साळवे पुतळा आणि वासुदेव फडके यांचा देखील पुतळा परिसराची दुरावस्था झाली आहे. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे हे वेळोवेळी लक्षात आणून देऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.मागील चार वर्षाच्या काळात पिंपरी महापालिकेवर प्रशासकीय राजवट होती, या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला असून या काळात झालेल्या सर्व विकास प्रकल्पांची श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी तसेच देण्यात आलेल्या वर्क ऑर्डरची माहिती सामान्य नागरिकांना समजण्यासाठी जाहीर करावी अन्यथा उच्च न्यायालयात पक्षाच्या वतीने दाद मागितली जाईल असा इशारा भाऊसाहेब अडागळे यांनी दिला.महाराष्ट्र मजूर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे यांनी यापूर्वी बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या विरोधात, पुणे लोकसभा मतदारसंघातून सुरेश कलमाडी यांच्या विरोधात आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून सहा वर्षांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकांमध्ये त्यांना उल्लेखनीय मते मिळाली होती. तसेच तत्कालीन हवेली विधानसभा मतदारसंघातून व भोसरी विधानसभा मतदारसंघातून देखील निवडणूक लढवली होती. या निवडणुका देखील भाऊसाहेब अडागळे यांना भरघोस मतदान झाले होते. यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत देखील महाराष्ट्र मजूर पक्षाने नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले होते. या उमेदवारांना मिळालेल्या मतामुळे प्रस्थापित पक्षांचे अनेक दिग्गज उमेदवार पराभूत झाले होते हा इतिहास पाहता पुढील महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका च्या निवडणुकीमध्ये निवडणुक लढणार असल्याचे अडागळे यांनी सांगितले.

आज घारोंदा येथे महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब अडागळे, महिला शहराध्यक्ष सविता आव्हाड, शहर अध्यक्ष सुरेश मिसाळ, प्रदेश खजिनदार मोहन कांबळे, हवेली तालुका अध्यक्ष मीना रणदिवे, अल्पसंख्यांक सेल पुणे जिल्हाध्यक्ष इकबाल शेख, वाहतूक आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष मयूर गायकवाड, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भिसे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष राजू लोनके आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button