दादा आले………. अण गेले. एच आर न्यूज मराठी
संपादक हनुमंत रामदासी पिंपरी चिंचवड,20 सप्टेंबर 2025 एच आर न्यूज मराठी
आज काळेवाडी रागा पॅलेस येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसंवाद आयोजित करण्यात आला होता
पिंपरी चिंचवड शहरातील सर्व भागातून हजारोंच्या संख्येने जनसंवाद या आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी समस्येसह सहभाग घेतला तेथील आलेल्या सर्व नागरिकांना शहरवासीयांना अजितदादांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून अनेक नागरिकांचे जागेवरच तात्काळ निर्णय घेऊन समस्या सोडवल्या असल्याचे दिसून आले.उत्स्फूर्त प्रतिसाद जन संवाद कार्यक्रमाला दिसून आला समस्या घेऊन आलेल्या एक्साईट परिवर्तन कामगार युनियन संघांची समस्या होती ती तात्काळ कामगार मंत्री यांना फोन करून अजितदादा आणि सांगितले व त्याच्यावर मार्ग काढून सर्वांची कामे करा अशी सूचना अजितदादांनी दिली यावर एक्साईट परिवर्तन कामगार युनियन संघटना समाधानी असल्याचे कामगारांनी सांगितले त्या कार्यक्रमांमध्ये जवळपास 4000 ते 5000 हजार जनसुदय आला होता त्यातील काही समस्याचे तात्काळ सोडविल्या असल्याची माहिती मिळली पण दादांनी पत्रकारकडे पाट फिरवली. दादा पत्रकारांशी संवाद न साधताच दादा गेले.