Uncategorized

पथविक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन दरबारी पाठपुरावा करणार : माऊली भोसले

मोशीतील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईला भेट देऊन विक्रेत्यांशी साधला संवाद

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि. १७ : पिंपरी-चिंचवड शहरातील पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लोकनियुक्त पथविक्रेता समितीचे सदस्य माऊली उर्फ किसन भोसले यांनी दिली.​

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भोसले यांनी मोशी येथील छत्रपती संभाजी महाराज भाजी मंडईला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी तेथील भाजी विक्रेते आणि लहान-मोठ्या व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधला व त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रेत्यांनी व्यवसायादरम्यान भेडसावणाऱ्या विविध पायाभूत अडचणी, प्रशासकीय प्रश्न आणि मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या.

​विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भोसले म्हणाले, “शहरातील पथविक्रेत्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा केला जाईल. पथविक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांना वाचा फोडणे आणि त्यांना सुरक्षित व्यवसाय वातावरण मिळवून देणे हे आमचे कर्तव्य असून, त्यांच्या हक्कांच्या रक्षणासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”​

समितीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष जागेवर येऊन समस्या जाणून घेतल्यामुळे भाजी विक्रेते व व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पथविक्रेता समितीच्या माध्यमातून हे प्रश्न लवकरच निकाली निघतील, असा विश्वास यावेळी उपस्थित विक्रेत्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button