Uncategorized
तळेगाव MIDC मधील शाफ्लेर इंडिया कंपनीत CO₂ गॅस गळती; दोन कामगारांचा मृत्यू, तिघे जखमी

एच आर न्यूज मराठी प्रतिनिधी दि. ९ : मावळ तालुक्यातील तळेगाव MIDC परिसरातील शाफ्लेर इंडिया कंपनीत काही वेळापूर्वी CO₂ (कार्बन डायऑक्साइड) गॅस गळतीची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत.
मृत कामगारांची नावे गौरीशंकर शर्मा आणि वैभव भोरात अशी आहेत. तर श्रीकृष्ण साहू, गणेश उंबरे आणि नरसिंह पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्नालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच कंपनी प्रशासन, MIDC सुरक्षा यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. गॅस गळती नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू असून परिसरात खबरदारीचे उपाय करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे तळेगाव MIDC परिसरात खळबळ उडाली असून कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक तपशील प्रतीक्षेत आहेत.