बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावे

ग्राहकाशी संवाद हरवल्याने लोक खाजगी सावकाराकडे वळतात: अर्थमंत्री सीतारामन
मुंबई: ७ (HRNM)सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बत्येक शाखेत नियुक्त केलेला कर्मचारी स्थानिक ग्राहक समजू शकेल आणि न्यांच्या भाषेत संवाद साधू शकेल याची बात्री बँकांनी करावी. कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन यांच्या स्थानिक भाषेतील प्रावीण्यावरही ब्ले पाहिजे, असे अर्थमंत्री निर्मला तारामन यांनी म्हटले आहे. त्यांनी साठी (एचआर) धोरणांमध्ये बदल करण्याचे आवाहनही केले आहे.एसबीआयच्या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भारताला जागतिक दर्जाच्या बँकांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.हे धोकादायक आहे: काही प्रकरणांत लोक बँकांकडून कर्ज नाकारल्यामुळे सावकारांकडे वळतात, हे धोकादायक आहे. तुम्ही (बँका) कर्जदाराचा मृत्यू येईपर्यंत कागदपत्रे सिद्ध करत राहण्याची आणि पुरवण्याची जबाबदारी टाकू शकत नाही. अशा छोट्या चुका दुरुस्त केल्यास, बँका देशातील सर्वाधिक मान मिळवणाऱ्या संस्था ठरतील, असे त्यांनी शेवटी म्हटले.बँक अन् ग्राहकांत वाढला दुरावाअर्थमंत्री म्हणाल्या की, ग्राहकांशी थेट संवादाचा अभाव वाढल्याने अनेक बँका क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांवर अतिनिर्भर झाल्या आहेत. या कंपन्या डेटा अद्ययावत करण्यास विलंब करतात, त्यामुळे कर्ज पात्र असलेले ग्राहकही कधी कधी नाकारले जातात. पूर्वी शाखा अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील ग्राहकांची ओळख होती. कोण कर्जफेडीला प्रामाणिक आहे, कोण विश्वासार्ह आहे, हे कळत होते; पण आता हे नातं कमी झालं आहे.सोने-चांदीच्या दरात पुन्हा उसळीनवी दिल्ली: दोन दिवसांच्या सलग घसरणीनंतर गुरुवारी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. राष्ट्रीय राजधानी बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ६०० रुपयांनी वाढून १,२४,७०० रुपयांवर पोहोचला. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत आणि स्थानिक व्यापाऱ्यांच्या नव्या खरेदीमुळे ही वाढ झाली आहे.दरम्यान, चांदीच्या दरात १,८०० रुपयांची वाढ झाली असून ती प्रति किल्ल १,५३,३०० रुपयांवर गेली आहे. मंगळवा ती १,५१,५०० वर होती. बुधवारी बाजार नानक जयंतीमुळे बंद होता.अमेरिकेतील शटडाउन दीर्घक चालल्याने गुंतवणूकदार गुंतवणुकीकडे वळले आहेत.