चाकणमध्ये बँक खाते हॅक करून १० लाखांची ऑनलाईन दरोडेखोरी!
चाकण (HR News मराठी ) दि. २३ : सायबर गुन्हेगारांनी चाकण परिसरातील एका व्यक्तीच्या संमतीशिवाय त्याचे ॲक्सिस बँक खाते विनाविलंब हॅक करून खात्यातून तब्बल १० लाख ७४,१२९ रुपये परस्पर लांबवल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
मुख्य मुद्दे
घटनेचे ठिकाण: मेदणकरवाडी, ता. खेड, जि. पुणे.फिर्यादी: विकासकुमार पटलेस (वय ३२ वर्ष, रा. गव्हाणेवस्ती, मेदणकरवाडी, चाकण).आरोपी: अज्ञात सायबर चोरटा.दाखल गुन्हे: चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१८(४), ३१९(२) आणि आयटी ॲक्ट ६६(क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल.
सविस्तर वृत्त
१६ जून २०२५ ते ४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. फिर्यादी विकासकुमार पटलेस यांचे ॲक्सिस बँकेत खाते आहे. अज्ञात सायबर हॅकर्सनी फिर्यादीची कोणतीही संमती नसताना आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांचे बँक खाते हॅक केले. अत्यंत हुशारीने खात्यातून टप्प्याटप्प्याने एकूण १०,७४,१२९/- रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली. या मोठ्या सायबर चोरीमुळे चाकण परिसरात खळबळ उडाली असून वपोनि साळुंखे या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.