तळजाई टेकडीवर ‘वृक्षमित्र’ अरुण पवार यांचा १० हजार वृक्ष लागवड व संवर्धनाचा महासंकल्प; आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनी भव्य वृक्षारोपण!

”झाडे फक्त लावणार नाही, जगवणार”वृक्षमित्र अरुण पवार
पिंपरी दि. ७ : आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन कामगार विभागाच्या ‘महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ’ (पुणे विभाग, सहकारनगर) अंतर्गत कामगार कल्याण भवनाच्या वतीने तळजाई टेकडीवर भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राज्यस्तरीय ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज वनश्री वनमित्र पुरस्कार’ विजेते वृक्षमित्र अरुण पवार यांनी तळजाई टेकडीवर १० हजार वृक्ष लागवड व त्यांच्या संवर्धनाचा (संगोपन) महासंकल्प सोडला. या मोहिमेची सुरुवात म्हणून टेकडीवर विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली.
निसर्ग रक्षणासाठी कृतीशील व्हा: अरुण पवार
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वृक्षमित्र अरुण पवार यांनी पर्यावरणाच्या ढासळत्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.
“फक्त घोषणा देऊन पर्यावरण वाचणार नाही, तर त्यासाठी प्रत्येकाने जमिनीवर उतरून कृतीशील होणे गरजेचे आहे. याच भावनेतून यावर्षी १० हजार झाडे दान करण्याचा आणि स्वतः त्यांची लागवड करून ती जगवण्याचा संकल्प मी केला आहे,” असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
मान्यवरांची उपस्थिती आणि कौतुक
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संजय विद्वांस आणि पुणे शहर गुणवंत,कामगार कल्याण मंडळाचे सदस्य मुकुंद खटावकर उपस्थित होते.

या दोघांनीही आपल्या मनोगतात वृक्ष लागवडीचे महत्त्व विशद केले आणि कामगार कल्याण मंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.व्यासपीठावरील प्रमुख उपस्थिती:मनोज पाटील (प्र. सहाय्यक कल्याण आयुक्त, पुणे विभाग),उद्धव रामराजे (सहाय्यक लेखा अधिकारी),संजय थोरात (अधिक्षक),सुधाकर पाटील (सहाय्यक अधिक्षक),तुषार रावळ (कनिष्ठ लिपिक),अरुण डोळे, सुहास भोसले,सुहास माने (केंद्र संचालक, कामगार कल्याण भवन)शोभा पोंगारे (केंद्र महिला कल्याण सहायिका)विकास पवार (केंद्र सेवक), रंजना बाठे.’झाडे लावा.. झाडे जगवा..’ ची सामूहिक शपथतळजाई टेकडीवरील हा कार्यक्रम केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न राहता, तिथे उपस्थित सर्वांनी निसर्ग रक्षणाची सामूहिक शपथ घेतली.
“झाडे लावा.. झाडे जगवा…”
अशा घोषणांनी संपूर्ण तळजाई टेकडीचा परिसर दुमदुमून गेला होता. पर्यावरण रक्षणाचा एक कडक आणि सकारात्मक संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुणेकरांना देण्यात आला.