ब्रेकिंग न्यूज: हवामान विभागाचा कडक इशारा!
पुणे प्रतिनिधी दि. ४ : राज्यात पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभागाने (IMD Mumbai) रात्री उशिरा महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील ७ मुख्य जिल्ह्यांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट:
मुंबई आणि मुंबई उपनगर,पुणे,ठाणे आणि पालघर,नाशिक,रायगड
हवामान विभागाचा अंदाज काय?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत या जिल्ह्यांमधील काही भागात मध्यम ते अतिमुसळधार (Moderate to intense Rain) पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह पावसाची हजेरी असू शकते.
नागरिकांना आवाहन:
अचानक येणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्यावा आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.