Uncategorized

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळा तर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा

पिंपरी प्रतिनिधी दि. १३ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सहकारनगर येथील कामगार कल्याण भवनाच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

ध्वजारोहण गुणवंत कामगार महमंदशरीफ मुलाणी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गुणवंत कामगार बाळासाहेब साळुंके, प्रा. सागर खळदकर, उद्धव रामसने, प्रमोद जोशी तसेच कामगार कल्याण सहआयुक्त मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Lकार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज पाटील यांनी केले. बाळासाहेब साळुंके यांनी बदलत्या कामगार कायद्यांवर भाष्य करताना नवीन कायद्यांमुळे कामगारांचे अस्तित्व धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली. प्रा. सागर खळदकर यांनीही कामगारांच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले.

अध्यक्षीय भाषणात महमंदशरीफ मुलाणी यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन केले. तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहिर अमर शेख, प्र. के. अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी साहित्य, पोवाडे आणि विचारांच्या माध्यमातून जनजागृती केल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

सिराज मुलाणी, नंदकुमार धुमाळ, वसीम मुलाणी, पांडुरंग सुतार, यासिन शेख, रघुनाथ फेगडे, शकील मुलाणी आणि झहीर मुलाणी यांना पुष्प देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय थोरात यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुहास माने यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. कळंबे, श्री. जोशी, मंडळाचे सर्व केंद्रसेवक श्रीमती बाठे, श्रीमती पांगारे तसेच श्री. प्रविण श्रीवास यांनी विशेष प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button