Uncategorized

बडूरच्या स्वराज मानेची गरुडझेप.

राज्यस्तरीय मंथन परीक्षेत तालुक्यात प्रथम!

निलंगा / प्रतिनिधी दि. ३१: महाराष्ट्र राज्यस्तरीय मंथन परीक्षेत निलंगा तालुक्यातील बडूर गावचा सुपुत्र कुमार स्वराज सुखदेव माने याने निलंगा केंद्रामध्ये प्रथम क्रमांक पटकावून दैदीप्यमान यश संपादन केले आहे. त्याच्या या घवघवीत यशामुळे बडूर पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

स्वराजने अत्यंत चिकाटी, जिद्द आणि अभ्यासातील सातत्याच्या जोरावर हे यश खेचून आणले आहे. तो श्री. दत्ता भीमराव माने यांचा नातू, श्री. नामदेव दत्ता माने यांचा पुतण्या आणि सौ. तनुजा व श्री. सुखदेव दत्ता माने यांचा चिरंजीव आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेत मारलेली ही गरुडझेप कौतुकास्पद ठरत आहे.

​सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव स्वराजच्या या यशाबद्दल माने कुटुंबासह बडूर ग्रामस्थ, शिक्षक वर्ग, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button