बार्शीच्या विकासाचा झंझावात आता सोलापूर जिल्ह्यावर; दीपक आबा वैद्य सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी विराजमान!

आमदार राजाभाऊ राऊत यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीचा विजय; बार्शी तालुक्यात आनंदाचे वातावरण
बार्शी प्रतिनिधी : २१ सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून, बार्शीचे खंबीर नेतृत्व आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मा. दीपक अरुण (आबा) वैद्य यांची सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडीमुळे बार्शी तालुक्याला जिल्हा स्तरावर मोठा बहुमान मिळाला असून, ग्रामीण भागाच्या विकासाला आता नवी गती मिळणार आहे.
आमदारकीपेक्षा ‘विकासाला’ प्राधान्य!
विशेष म्हणजे, मा. राजाभाऊ राऊत यांना विधानपरिषद आमदारकी किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपद यापैकी एका निवडीचा शब्द राज्यस्तरीय नेतृत्वाकडून मिळाला होता. मात्र, स्वतःसाठी मिळणारी आमदारकीची संधी डावलून, राजाभाऊंनी बार्शी तालुक्याचा सन्मान आणि ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास याला प्राधान्य दिले. बार्शीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झुकते माप मिळावे, या उद्देशाने त्यांनी दीपक आबा वैद्य यांच्यासाठी हे पद खेचून आणले.
किंगमेकरची भूमिका आणि विकासाची दखल
गेल्या काही वर्षांत राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यात केलेल्या विकासकामांची दखल थेट राज्याच्या नेतृत्वाने घेतली आहे. त्यांच्या या कामाची पावती म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाच्या विकासाची धुरा आता त्यांच्या विश्वासातील सहकाऱ्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. दीपक आबा वैद्य हे एक संयमी आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात, त्यामुळे ते या पदाला योग्य न्याय देतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शेंद्री ग्रामस्थांकडून जल्लोष
या ऐतिहासिक निवडीबद्दल ग्रामपंचायत शेंद्री व समस्त शेंद्री ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष मा. दीपक आबा वैद्य आणि या विजयाचे शिल्पकार (किंगमेकर) आमदार मा. राजाभाऊ राऊत यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
“बार्शी तालुक्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. राजाभाऊंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा चेहरामोहरा नक्कीच बदलेल.” — ग्रामस्थ, शेंद्री.