Uncategorized

संपत्तीसाठी पोटच्या मुलाची आई आणि भावाविरोधात कोर्टात धाव!

पिंपरीत कौटुंबिक कलहाचा धक्कादायक प्रकार!

मृत वडिलांचे बनावट इच्छापत्र बनवून कोर्टाची फसवणूक; ८२ वर्षीय वृद्ध आईसह भावावर गुन्हा दाखल!

प्पिंपरी (मोरवाडी)प्रतिनिधी दि. २४ :संपत्तीच्या हव्यासापोटी नात्यांना काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना पिंपरी कोर्टातून समोर आली आहे. मृत वडिलांच्या नावे बनावट आणि खोटे इच्छापत्र (Will) तयार करून ते न्यायालयात सादर करत फसवणूक केल्याप्रकरणी, एका ५२ वर्षीय व्यक्तीने थेट आपल्या ८२ वर्षीय वृद्ध आई आणि ६० वर्षीय मोठ्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.​

कोर्टात उघड झाला बनावट दस्तऐवज

अजित विष्णू चाळके (वय ५२, रा. चिंचवड पूर्व) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यांचे मयत वडील विष्णू भाऊराव चाळके यांच्या नावावर असलेली संपत्ती बळकावण्यासाठी, आरोपी आई श्रीमती विजया विष्णू चाळके (वय ८२) आणि भाऊ अविनाश विष्णू चाळके (वय ६०, रा. पुनावळे) यांनी संगनमत केले. त्यांनी वडिलांचे एक खोटे व बनावट इच्छापत्र तयार केले. हे बनावट इच्छापत्र खरे असल्याचे भासवून त्यांनी ते अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय (मोरवाडी, पिंपरी) येथे दिवाणी दाव्यादरम्यान सादर केले. हा बनावट प्रकार उघडकीस आल्यानंतर कोर्टाच्या आवारातच हा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

​गुन्हा तपशील:

संत तुकारामनगर पोलीस ठाणे गु.र.नं. २८६/२०२६कलम: BNS कलम ३३६(२), ३३६(३), ३३८, ३४०(३), ३(५).तपास अधिकारी: पोउपनि आटवे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button