स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; आमदार अण्णासाहेब बनसोडे व नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे यांच्या सौजन्याने ‘दिवाळी पहाट’ उत्साहात संपन्न!

अखिल पिंपरी-चिंचवड कलामंच आणि अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांचा स्तुत्य पुढाकार; गाणी, लावणी अन् लोकधारेने जिंकली रसिकांची मने
पिंपरी-चिंचवड (विशेष प्रतिनिधी) दि. ८ : दिवाळीच्या मंगलमय व आनंददायी वातावरणात स्थानिक कलाकारांना स्वतःची कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘अखिल पिंपरी-चिंचवड कलामंच’च्या वतीने भव्य ‘दिवाळी पहाट’, सांस्कृतिक कार्यक्रम व फराळ वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष तथा आमदार अण्णासाहेब दादू बनसोडे आणि प्रभाग क्र. ९ चे नगरसेवक सिद्धार्थ अण्णासाहेब बनसोडे यांच्या सौजन्याने सांगवी येथील डॉल्फिन्स गार्डन स्टुडिओ येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा अभिनेत्री भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात स्थानिक कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करून रसिकांची मने जिंकली.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचे बहारदार दर्शन
या सांस्कृतिक सोहळ्यात महाराष्ट्राची लोकधारा, अभंग, भक्तिगीते, भावगीते, हिंदी-मराठी सदाबहार गीते, लावणी आणि काव्यरचना अशा विविधांगी कलाप्रकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. शहराच्या विविध भागांतील कलाकारांनी एकत्र येत आपल्या प्रतिभेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमास पत्रकार मुज्जफर इनामदार, आंतरराष्ट्रीय गायक चंद्रकांत पवार, राष्ट्रवादी नेते राजेंद्र जगताप, चित्रपट निर्माते सूर्यकांत पवार आणि कीर्तनकार पुरुषोत्तम हिंगणकर महाराज आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
“स्थानिक कलाकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहू” — भाग्यश्री (टिना) शर्मा घेवारे
आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री घेवारे म्हणाल्या:
“पिंपरी-चिंचवड शहरात अनेक गुणवंत कलाकार आहेत, मात्र त्यांना योग्य व्यासपीठ मिळण्याची गरज असते. स्थानिक कलाकारांना प्राधान्य देऊन त्यांच्या कलेला योग्य सन्मान व ओळख मिळवून देण्यासाठी अखिल पिंपरी-चिंचवड कलामंच कटिबद्ध आहे. आमदार अण्णासाहेब बनसोडे हे कलाकारांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहतात, ते आमच्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत. तसेच कमी वेळेत हॉल उपलब्ध करून देणारे डॉल्फिन्स गार्डनचे सर्वेसर्वा राज सोमवंशी यांचेही आम्ही आभारी आहोत.”
कलाकारांची उत्स्फूर्त दाद व बहारदार सादरीकरण
•गायन: विद्या गायकवाड नढे, गायत्री साळवे, अशोक टाकळे, मनीषा इंगोले, जगन्नाथ खाडे, शेखर चांदणे, अमित देशमाने, प्रतीक सत्वाधीर, रेखा दुसाने, कोमल भोसले, सागर डाडर, संतोष माहेश्वरी, प्रमोद कुलकर्णी, सविता कोरडे, कविता तळेकर, मनीषा सपकाळे आणि सुरेखा कुलाल यांनी आपल्या सुमधुर गायनाने समा बाधंला.
•वाद्यवृंद: सेन कुमार, श्रीराम इंगळे, अशोक जाधव, विलास अडागळे, सोमनाथ कांबळे, राजकुमार काजोरिया, लखन अडागळे, गोकुळ व रोहन कळदकर यांनी सुरेल साथसंगत केली.
•लावणी व लोकधारा: वृषाली सातपुते, भारती मोरे, सुजाता कुंभार आणि फिरोज मुजावर यांनी बहारदार लावणी सादर केली. तर रवी कांबळे, सँडी पाटील, सिद्धांत घागरमले, कावेरी गंगाळे, आकाश गायकवाड, रवींद्र शिंदे, लीनेश घाडगे, अमोल अडागळे व भाऊसाहेब सांगळे यांच्या ग्रुपने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ सादर करून प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन लीनेश घाडगे व विक्रांत शिंदे यांनी केले, तर सुनील पाटील टेक्नॉलॉजी यांनी दर्जेदार ध्वनी व्यवस्था सांभाळली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश नवगिरे, मनीषा बाराथे, मेबल अल्ल्हाट, मंगला पवार, मोनिका शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी सर्व कलाकारांचा व उपस्थितांचा फराळ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी या कौतुकास्पद आयोजनाबद्दल आयोजकांना मनापासून शुभेच्छा दिल्या.