Uncategorized

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बोनस व वेतनासाठी उद्या पिंपरी पालिकेवर ‘विनम्र अभियान पदयात्रा’

कामगार नेते यशवंतभाऊ भोसले आक्रमक

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी दि २८ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांत कार्यरत असलेल्या सुमारे साडेचार हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ नये यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सन २०२५-२०२६ चा बोनस आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन ३ नोव्हेंबरपूर्वी मिळावे, तसेच समान काम समान वेतनासह इतर मागण्यांसाठी उद्या, गुरुवार (दि. २९ ऑक्टोबर) रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महापालिका भवन अशी ‘विनम्र अभियान पदयात्रा’ काढण्यात येणार आहे. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या या पदयात्रेद्वारे महापौर रवी लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात येणार आहे.​सुमारे ४,५०० कंत्राटी कामगारांच्या मागण्यांचा लढाआरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, वाहनचालक, वैद्यकीय विभागातील स्वच्छता सेवक, वॉर्ड बॉय, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी, उद्यान, अग्निशमन, पालिका शाळांमधील शिपाई व स्वच्छता कर्मचारी, स्मशानभूमी आणि पाणीपुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे भोसले यांनी लक्ष वेधले.​

या पदयात्रेत प्रामुख्याने पुढील मागण्या लावून धरण्यात येणार आहेत:​

•दिवाळीपूर्वी बोनस व वेतन: ३ नोव्हेंबर २०२६ पूर्वी बोनस कायद्यानुसार सन २०२५-२०२६ चा बोनस आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन तातडीने जमा करणे.​समान काम, समान वेतन: पालिका आस्थापनेवरील नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही समान काम समान वेतन लागू करणे.​

•विमा संरक्षण: कर्मचाऱ्यांना कुटुंबीयांसह ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण देणे.​

आर्थिक भरपाई व अनुकंपा तत्त्वावर नोकरी: सेवेत असताना अपघाती किंवा आजारपणामुळे मृत्यू झाल्यास वारसदारास २५ लाख रुपयांची आर्थिक मदत आणि अनुकंपा तत्त्वावर पालिकेत थेट नोकरी देणे.

​‘प्रिन्सिपल एम्प्लॉयर’ म्हणून पालिकेने जबाबदारी घ्यावी : पंधरा दिवसांपूर्वी पुण्यात उपकामगार आयुक्त अभय गीते यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत यशवंतभाऊ भोसले म्हणाले, “त्या बैठकीस महापालिकेचे कामगार अधिकारी प्रमोद जगताप उपस्थित होते. कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्वरित बोनस देण्याचे आदेश संबंधितांना काढण्याचे निर्देश उपकामगार आयुक्तांनी दिले होते. मात्र, अद्याप याबाबतचे आदेश कंत्राटदारांना दिले आहेत की नाही, हे अस्पष्ट आहे. अनेक कंत्राटदार ‘वेLocationतनातच दरमहा बोनस देतो’ अशी खोटी बतावणी करून कामगारांना बोनसपासून वंचित ठेवतात.”​

कंत्राटदारांनी बोनस आणि वेतन न दिल्यास, कायद्यानुसार ‘मुख्य मालक’ (Principal Employer) म्हणून महापालिका आयुक्तांची ही थेट जबाबदारी ठरते. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे तसे निर्देश आहेत. त्यामुळे आयुक्तांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दिवाळीपूर्वी कामगारांच्या खात्यात बोनस व वेतन जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

​उद्या दुपारी ३:३० वाजता पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा महापालिकेच्या मुख्य इमारतीकडे मार्गस्थ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button