मा. नगरसेवक ननावरे यांनी ए्स आर ए प्रकल्प आरोपाचे केले खंडण

माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी ए्स आर ए अंतर्गत केलेल्या आरोपाचे केले खंडन
भोसरी ; २३ [HRNM] २० तारखेला काळेवाडी येथे झालेल्या उप मुख्यामंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित केला होता. या जनसंवाद कार्यक्रमात दादांनी अनेक प्रश्न सोडविल.ए्स आर ए गृहप्रकल्पअंतर्गत अजित दादांना निवेदन दिले होते. डी वाय पाटील जवळ फुले नगर येथे ए्स आर ए गृहप्रकल्प चालू आहे या गृहप्रकल्पामध्ये भ्रष्टचार आहे असे निवेदन का दिले म्हणून मला जीवे मारण्याची धमकी ननावरे यांनी दिली असा आरोप करत शुभम यादव यांनी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या संदर्भात ननावरे यांची भेट घेऊन माहिती घेतली असता त्यांनी हा राजकीय हेतू असून मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे सांगत आरोपाचे खंडन केले.हा गृहप्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे सर्वे करत असताना काहीतांत्रिक त्रुटी झाल्या असतील त्या त्रुटी एस आर ए च्या कार्यालयात जाऊन दुरुस्ती अर्ज देऊन दुरुस्त करता येतात . जनसामान्य माणसाला घर मिळावे या साठी काम करणारा मी एक दुवा आहे यात माझे व बांधकाम व्यावसायिकाचे कसलेही संगनमत नाही जे सभासद पात्र असतील त्यांना घर मिळेल अपात्र नागरिकांचे पुरावे मागवण्यात आले आहेत जे पात्र असतील त्यांना घरे मिळतील. या प्रकल्पात माझा कसलाही हस्तक्षेप नाही मला यात नाहक बदमान करण्याचे षडयंत्र आहे. या प्रकरणाला राजकीय वळण देऊन मला बदनाम केलं जात आहे.
असे त्यांनी बोलताना सांगितले