गिरनार गोरखनाथ मूर्तीभंजन विटंबनेचा पुण्यात निषेध

गिरनार गोरखनाथ मूर्तिभंजन घटनेचा पुण्यात निषेधदोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
भोसरी, ता. ६ : (HRNM)दत्त संप्रदायातीलअतिशय पवित्र मानलेल्या गिरनार क्षेत्रातील आद्य नाथपंथीय गुरू गोरखनाथ यांच्या मूर्तिभंजनाच्या घटनेचा श्री गुरुदेव दत्त सेवा संस्था लांडेवाडी दत्त मंदिराच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या या लांछनीय प्रकारास जबाबदार असलेल्या समाजकंटकांना तातडीने अटक करून शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.रविवार रात्री ५ म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी गोरखनाथ शिखरावरील गुरू गोरखनाथ यांच्या मूर्तीची विटंबना करून ती मूर्ती उचलून तेथील मंदिराच्या मागीलबाजूस टाकण्याचे संतापजनक कृत्य करणाऱ्यांचा ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांनी कठोर शब्दांत निषेध केला. श्री गुरुदेव दत्त सेवा संस्थान लांडेवाडी संस्थापक विश्वस्त – श्री अशोकराव बिचकुले मामा, श्री.प्रल्हाद पासलकर व मंदिराचे पुजारी शशिकांत तुळसे काका व सर्व दत्तभक्त संदेश वारगे सुधीर पोतदार सतीश मोगली महेश थिगळे विष्णू बिरादार यांनी हा निषेध व्यक्त केला. याबाबतचे निवेदन पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना पाठविण्यात येणार आहे