“पावसाळ्यानंतरही पाऊस” असे रोजचेच वातावरण

दिवाळी संपली तरी राज्यभरात पाऊस
दि 28 (HRNM)दिवाळी संपली तरी राज्यभरात सुरू असलेला पाऊस आणि सकाळच्या वेळी वाढलेले तापमान यामुळे मुंबईसह राज्यातील सर्व नागरिक नेमका कोणता ऋतू सध्या सुरू आहे हेच कळत नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दिवाळीही पावसाच्या प्रभावाखाली संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवल्यातही पाऊस असल्याने वर्षभर पावसाळाच अनुभवायचा का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे . दुपारच्या वेळी असह्य होणारा उकाडा आणि उन तापल्याने छत्री घरात ठेवल्यानंतर संध्याकाळी अचानकपणे उपस्थिती लावणारा पाऊस यामुळे मुंबईसह सर्व राज्यातील नागरिकांची शुक्रवारी त्रेधा उडाली. दक्षिण मुंबईमध्ये शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू होऊन मुंबईकर जगोजागी अडकण्याचीही स्थिती निर्माण झाली. मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिलेला असला तरी एखाद-दुसरी सर येऊन पाऊस थांबेल , असा मुंबईकरांचा अंदाज होता. मात्र जोरदार पावसामुळे या अंदाजांवरही पाणी फिरल्याचे दिसले,अरबी समुद्रात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र उत्तर आणि ईशान्य दिशेने प्रवास करत असून, शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी हे क्षेत्र पणजीपासून ३८० किलोमीटरवर स्थित होते.
उकाडा आणि पावसामुळे मुंबईकर हैराण
दिवसभर उकाड्याने मुंबईकर त्रासले असतानाच संध्याकाळी पावसाने त्यांना गाठले. बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी राज्यामध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले असून, वातावरणातील आर्द्रता वाढल्याने ऑक्टोबरअखेरीस मुंबईत किमान तापमानाचा पारा २७अंशांवर पोहोचला आहे. सांताकूश येथे येथे शुक्रवारी सकाळी किमान तापमानाची नोंद सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिक झाली. मुंबईमध्ये कमाल तापमानाचा पारा चढ़ा असताना वातावरणातील आर्द्रतेमुळे किमान तापमानही अधिक आहे.त्यामुळे सकाळच्या वेळीही उकाड्याची जाणीव तीव्र होत आहे. कुलाबा येथे शुक्रवारी २५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सकाळच्या वेळी कुलाबा येथे ८१ टक्के तर सांताक्रूझ येथे ७८ टक्के आर्द्रता नोंदली गेली, कुलाबा येथे कमाल तापमान ३३.८ अंश तर सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३५.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सांताक्रूझ येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा १.१ अंशांनी अधिक होते. असे प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेदिवाळी संपली तरी पाऊस थांबेना: थंडी जाणवेनाबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रकिमान तापमान सरासरीपेक्षा चार अंशांनी अधिकमच्छिमारांना इशारा कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता लक्षात घेता आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी पूर्व मध्य आणि आग्नेय अरची समुद्रामध्ये जाऊ नये असा इशारा मच्छिमारांना देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र, गुजरातणी किनारपट्टी, केरळ, कर्नाटकची किनारपट्टी येथेही समुद्रात जाऊ नये असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.अंदाजानुसार शनिवारी आणि रधिधारी बृहन्मुंबई सह परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.शुक्रवारी मुंबईतच नव्हे तर पुणे, लोहगाव, अहिल्यानगर, जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अकोला, बुलडाणा, नागपूर, यवतमाळ या केंद्रांवरही किमान तापमानाचा पारा सरासरीहून तीन अंश किंवा अधिक फरकाने चढलेला होता. लोहगाव येथे किमान तापमान सरासरीहून ६.३ अंशांनी अधिक तर नाशिक येथे किमान तापमान सरासरीहून ६.१ अंशांनी अधिक असल्याची नोंद झाली. शुक्रवारी संध्याकाळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यात संध्याकाळच्या वेळी पावसाने हजेरी लावली. दक्षिण मुंबईत संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडला. हाजी अली, ब्रिटानिया पंपिंग स्टेशन, नायर रुग्णालय येथील स्वयंचलित हवामान केंद्रांवर २० ते २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर उत्तर मुंबईत ५ ते १० मिलीमीटर पावसाची नोंद झाली,