मुलाला विष पाजून मातेची आत्महत्या
चौदा महिन्यांच्या मुलावर सोलापुरात उपचार सुरू
बार्शी : =HRNM)शहरात वाणी प्लॉट परिसरातएका चौदा महिन्याच्या मुलास विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.अंकिता वैभव उकिरडे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून, १४ महिन्यांचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे याच्यावर बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. ही घटना शुक्रवार, ७नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास निदर्शनास आली. या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला अंकिता हिचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्व लोक कामानिमित्त बाहेर गेले होते. अंकिता ही घरात चिमुकल्यासह एकटीच होती. दरम्यान, नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या महिलेला घरात कोणी दिसले नाही. तिने खिडकीतून पाहिले असता, अंकिता ही सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली, तर लहानगा अन्वीक अत्यवस्थ अवस्थेत आढळला. त्यानंतर त्यांनी शेजारी राहणाऱ्या नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बार्शी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली