Uncategorized

डोक्यात बाटली फोडलेली तरुण जखमी

बार्शी:येथे डोक्यात बाटली फोडल्याने तरुण जखमी चार जणांवर गुन्हा दाखल

बार्शी :(HRNM) प्रतिनिधी दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही या कारणावरून तरुणांच्या डोक्यात बियरच्या बाटल्या फोडून जखमी करण्यात आले. ही घटना बार्शी येथील भोसले चौकात मंगळवारी पहाटेचा सुमारात घडली. वैभव विक्रम बोधले (वय ३१ रा. नाईकवाडे प्लॉट बार्शी) असे जखमीचे नाव आहे. त्याला मारहाण केल्याप्रकरणी किरण शिंदे आणि औदुंबर राऊत दोघे (रा. अमन चौक बार्शी) तसेच त्यांच्या २ साथीदाराविरुब्द गुन्हा दाखल केला आहे. वैभव भोसले हे काल मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास रेल्वे स्टेशन येथील आदर्श हॉटेल समोरून घराकडे निघाले होते भोसले चौक येथे वरील चौघांनी त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याचा राग धरून वरील आरोपींनी त्यांना लाथाबुछ्या तसेच डोक्यात तीन बाटल्या फोडून जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. हवालदार जाधव पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button