पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया संपन्न…
पिंपरी, ११ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत प्रक्रिया आज चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे संपन्न झाली. राज्य निवडणूक आयोगाने या आरक्षण सोडतीच्या कामासाठी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नियंत्रणाखाली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया पूर्ण झाली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे,सह आयुक्त मनोज लोणकर, सहायक नगर रचनाकार प्रशांत शिंपी, नगरसचिव मुकेश कोळप, सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, बापू गायकवाड, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार, अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेले महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सुरूवातीला राज्य निवडणूक आयोगाची आरक्षण सोडतीसाठी असणारी नियमावली सांगितली. त्यानंतर निवडणूक आरक्षण सोडत प्रक्रिया चार टप्प्यात संपन्न झाली.यामध्ये पहिल्या टप्प्यात अनुसूचित जाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत शाळकरी विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांकरिता राखीव असणाऱ्या जागांसाठी सोडत काढण्यात आली.आरक्षण सोडत प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग सोडत प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करण्याकरिता प्रक्रिया पूर्ण करून प्रभागनिहाय आरक्षित जागा जाहीर करण्यात आल्या.आरक्षण कामकाजाचे प्रास्ताविक उपायुक्त सचिन पवार यांनी तर सूत्रसंचालन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले………….

प्रभाग क्रमांक १ – चिखली गावठाण – मोरेवस्ती अ – ओबीसी राखीवब – महिलांसाठीक – महिलांसाठीड – ओपनप्रभाग क्रमांक
२ – बोऱ्हाडेवाडी – जाधववाडी – कुदळवाडी अ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – ओपनड – ओपनप्रभाग क्रमांक
३ – चऱ्होली- मोशी गावठाण – वडमुखवाडी – चोवीसावाडी – डूडूळगावअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीक – महिलांसाठीड – ओपनप्रभाग क्रमांक
४ – दिघी – बोपखेलअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – अनुसूचित जमातीक – ओबीसी महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक ५ – गवळीनगर – चक्रपाणी वसाहत अ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – ओबीसीक – महिलांसाठीड – ओपनप्रभाग क्रमांक
६ – धावडेवस्ती – भगत वस्ती – सद्गुरुनगर अ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – ओबीसीक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
७ – भोसरी गावठाण – सॅन्डवीक कॉलनी अ – ओबीसीब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
८ – इंद्रायणीनगर – गवळीमाथा – बालाजीनगर अ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
९ – नेहरूनगर – मासुळकर कॉलनी – खराळवाडी – गांधीनगरअ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१० – शाहूनगर – संभाजीनगर – मोरवाडी – विद्यानगर अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – ओपनड – ओपनप्रभाग क्रमांक
११ – पूर्णानगर – कृष्णानगर – घरकुल प्रकल्प – अजंठानगरअ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१२ – तळवडे गावठाण – रुपीनगर – त्रिवेणीनगरअ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१३ – निगडी गावठाण – सेक्टर २२ – ओटास्किम – यमुनानगरअ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१४ – चिंचवड स्टेशन – मोहननगर – रामनगर – काळभोरनगर – दत्तवाडीअ – ओबीसीसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१५ – आकुर्डी गावठाण – गंगानगर – वाहतूक नगरीअ – ओबीसीसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१६ – मामुर्डी – किवळे – वाल्हेकरवाडी – गुरुद्वारा अ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१७ – बिजलीनगर – प्रेमलोक पार्क – भोईरनगरअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
१८ – चिंचवड गावठाण – केशवनगर – वेताळनगर अ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – ओपनड – ओपनप्रभाग क्रमांक
१९ – उद्योगनगर – विजयनगर – भाटनगर – भाजी मंडई पिंपरी कॅम्पअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – ओपनड – ओपनप्रभाग क्रमांक
२० – संत तुकारामनगर – महात्मा फुलेनगर – लांडेवाडी – कासारवाडीअ – अनुसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२१ – पिंपरीगाव – मिलिंदनगर – जिजामाता रुग्णालय – वैभवनगरअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२२ – काळेवाडी विजयनगर – पवनानगर – ज्योतिबा नगर – नढेनगरअ – ओबीसी महिलांसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – ओपनड – ओपनप्रभाग क्रमांक
२३ – थेरगाव गावठाण – पडवळनगर – साईनाथनगरअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीसाठी राखीवक -महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२४ – थेरगाव दत्तनगर – गुजरनगर – आदित्य बिर्ला रुग्णालयअ – ओबीसीसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२५ – वाकड – पुनावळे – ताथवडेअ – अनूसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२६ – पिंपळे निलख – विशालनगर – कस्पटेवस्ती – वेणुनगर – रक्षक सोसायटी अ – अनूसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२७ – काळेवाडी तापकीरनगर – रहाटणी गावठाणअ – अनूसूचित जातीसाठी राखीवब – ओबीसी महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२८ – पिंपळेसौदागर – रामनगर – कुणाल आयकॉनअ – ओबीसीसाठी राखीवब – महिलांसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
२९ – पिंपळेगुरव – सुदर्शननगर – जवळकरनगरअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – अनूसूचित जमाती महिलांसाठी राखीवक – ओबीसीसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
३० – दापोडी – फुगेवाडी – कासारवाडी अ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीवक – ओबीसीसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
३१ – सांगवी विनायकनगर – गणेशनगर – उरो रुग्णालयअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपनप्रभाग क्रमांक
३२ – सांगवी गावठाणअ – अनुसूचित जाती महिलांसाठी राखीवब – ओबीसीसाठी राखीवक – महिलांसाठी राखीवड – ओपन

