‘ॲक्शन मोड’ ऑन!

पदभार स्वीकारताच निखिल बोऱ्हाडे थेट क्षेत्रीय कार्यालयात; प्रलंबित प्रश्न जागेवरच मार्गी!
आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वातील युवा नेतृत्वाचा महापालिका प्रशासनावर प्रभावी ठसा
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी दि. २४ : भारतीय जनता पार्टीचे मोशी प्रभाग क्रमांक २ चे लोकप्रिय नगरसेवक तथा नवनिर्वाचित ‘क’ प्रभाग (विजयदुर्ग) अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी पदभार स्वीकारताच कामाचा जोरदार धडाका सुरू केला आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी थेट क्षेत्रीय कार्यालयातच ठिय्या मांडत, अधिकाऱ्यांची कानउघाडणी करत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले आहेत. त्यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे महापालिका वर्तुळात आणि नागरिकांमध्ये एका वेगळ्याच धडाकेबाज कारभाराची चर्चा सुरू झाली आहे.
आमदार महेश लांडगे यांच्या कणखर नेतृत्वाखाली नुकतीच निखिल बोऱ्हाडे यांची ‘क’ प्रभाग अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. पदाचा चार्ज घेताच त्यांनी कोणताही औपचारिक वेळ न घालवता थेट जनसंपर्क आणि नागरी समस्यांच्या निवारणाला सर्वोच्च प्राधान्य दिले.
अधिकाऱ्यांची बैठक अन् जागेवरच ‘ऑन द स्पॉट’ निकाल!’
क’ प्रभाग (विजयदुर्ग) क्षेत्रीय कार्यालयात पोहोचताच अध्यक्ष निखिल बोऱ्हाडे यांनी संबंधित सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. यामध्ये परिसरातील:रस्ते दुरुस्ती व डांबरीकरणपाणीपुरवठ्यातील विस्कळीतपणास्वच्छता आणि कचऱ्याची समस्याइतर मूलभूत नागरी सुविधाया सर्व विषयांवर सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांच्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन बोऱ्हाडे यांनी तातडीच्या प्रश्नांवर प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आणि अनेक तक्रारींचा ‘ऑन द स्पॉट’ निपटारा केला. उर्वरित प्रलंबित कामांची कालमर्यादेत विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
राजकारणापेक्षा ‘जनकारणाला’ प्राधान्य!” नागरिकांना महापालिकेच्या कामांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात उत्तम समन्वय निर्माण करून सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”— निखिल बोऱ्हाडे, अध्यक्ष, ‘क’ प्रभाग
मोशी परिसरात राजकारणापेक्षा जनकारणाला प्राधान्य देणारा नेता म्हणून निखिल बोऱ्हाडे यांची ओळख आहे. आमदार महेश लांडगे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ते सातत्याने विकासकामांच्या पाठपुराव्यासाठी ओळखले जातात. अध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळताच महापालिकेच्या विविध विभागांशी समन्वय साधत त्यांनी प्रभागातील रखडलेल्या प्रश्नांची यादीच तयार केली असून, नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाचा ते स्वतः पाठपुरावा करणार आहेत.
पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी दाखवलेल्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे ‘क’ प्रभागात भाजपच्या पारदर्शक आणि नागरिकाभिमुख कारभाराची दमदार सुरुवात झाल्याची भावना स्थानिक नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया”
‘क’ प्रभाग अध्यक्ष म्हणून मिळालेली जबाबदारी ही माझ्यासाठी केवळ पद नसून, नागरिकांची सेवा करण्याची मोठी संधी आहे. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘विकास आणि विश्वास’ हे सूत्र घेऊन आम्ही काम करीत आहोत. प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझ्यासाठी महत्त्वाचा असून, नागरिकांना कोणत्याही कामासाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी मी कटिबद्ध आहे. ‘क’ प्रभागातील विकासकामांना अधिक गती देत पारदर्शक प्रशासन उभे करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू.”— निखिल बोऱ्हाडे > (अध्यक्ष, ‘क’ प्रभाग – विजयदुर्ग, भारतीय जनता पार्टी)