महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे विचार प्रबोधन पर्व २०२५ या कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, दि. १३ नोव्हेंबर २०२५ :(HRNM) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा दरवर्षीप्रमाणे क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजल्यापासून चिंचवड स्टेशन येथील पेट्रोल पंपाशेजारील जागेत संपन्न होणार आहे. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उद्या (शुक्रवार) सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास माजी खासदार, माजी आमदार, माजी नगरसदस्य,माजी नगरसदस्या तसेच अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर तसेच महानगरपालिकेतील विविध विभागप्रमुख आणि विविध सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या विचार प्रबोधनमध्ये शाहीरी कार्यक्रम, प्रबोधनपर गीते असे विविध कार्यक्रम होणार आहेत.
दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या कार्यक्रमांचा तपशील
अभिवादन कार्यक्रम...
1) क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या महानगरपालिकेतील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे. स्थळ : मनपा मुख्य प्रशासकीय इमारत, वेळ – सकाळी १०.३० वाजता
2) क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या चिंचवड स्टेशन येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे.स्थळ – चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या पुतळ्याशेजारी , वेळ – सकाळी ११ वाजता
चिंचवड स्टेशन येथील क्रांतिगुरू वस्ताद लहुजी साळवे यांच्या पुतळ्याशेजारी होणा-या कार्यक्रमांचा तपशीलः-
1) शाहिर बापू पवार यांचा शाहिरी कार्यक्रम..*वेळ – सकाळी ९ वाजता
२) लखन अडागळे आणि सहकारी यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम…
यानंतर
3)निलेश देवकुळे आणि सहका-यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम…
तरी या कार्यक्रमांस शहरवासियांनी उपस्थित रहावे असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.