देहूगाव येथील शतकोत्तर जुन्या पारधी समाज दफनभूमीच्या जागेचा प्रश्न सुटणार

आमदार सुनील शेळके यांचे तात्काळ आदेश
गेल्या शतकापासून असलेल्या दफनभूमीची विटंबना थांबवण्यासाठी पारधी समाजाचे शिष्टमंडळ आक्रमक; आमदारांना दिले निवेदनजागेवर ‘कंपाउंड’ बांधून ‘सातबारा’ नावावर करा;
३-४ वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश, आमदार शेळके यांच्याकडून तात्काळ कारवाईचे निर्देश
तळेगाव दाभाडे (विशेष प्रतिनिधी) दि. १२ : देहूगाव येथील गेल्या शंभर ते सव्वाशे वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आदिवासी पारधी समाजाच्या ऐतिहासिक दफनभूमीच्या जागेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि तिची होणारी विटंबना कायमची थांबवण्यासाठी पारधी समाज आक्रमक झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आदिवासी पारधी समाजाच्या एका मोठ्या शिष्टमंडळाने आज रविवार (दि. १२ जुलै २०२६) रोजी मावळचे कार्यसम्राट आमदार श्री. सुनील अण्णा शेळके यांची तळेगाव येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मागण्यांचे जाहीर निवेदन दिले.
देहूगाव येथे पारधी समाजाची अत्यंत जुनी हक्काची दफनभूमी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही समाजकंटक व नागरिकांकडून या पवित्र दफनभूमीच्या जागेवर जाणूनबुजून झाडे लावून व इतर मार्गांनी तिची विटंबना करण्याचा आणि जागा बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही विटंबना थांबवून या जागेला तातडीने मजबूत संरक्षक भिंत (कंपाउंड) घालण्यात यावी, तसेच या दफनभूमीचा अधिकृत ‘सातबारा’ आदिवासी पारधी समाजाच्या नावे करण्यात यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनात करण्यात आली.
क्षणार्धात सुटला प्रश्न… आमदारांचे थेट घटनास्थळावरूनच आदेश!
या संवेदनशील जागेविषयी आदिवासी पारधी समाजाचे खंबीर कार्यकर्ते अंकुश भोसले आणि माऊली उर्फ किसन भोसले हे गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सातत्याने प्रशासकीय पातळीवर लढा देत होते, पाठपुरावा करत होते. आज जेव्हा हे शिष्टमंडळ आमदार सुनील अण्णा शेळके यांना तळेगाव निवासस्थानी भेटले, तेव्हा आमदारांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून क्षणभराचाही विलंब न लावता तातडीने संबंधित शासकीय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून ‘तातडीने जागेची पाहणी करून कडक कारवाई करा’ असे थेट आदेश दिले. आमदार सुनील शेळके यांनी दाखवलेल्या या तडफदार आणि सकारात्मक भूमिकेमुळे देहूरोड विभाग, झेंडे मळा तसेच परिसरातील आजूबाजूच्या वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या संपूर्ण आदिवासी पारधी समाजामध्ये प्रचंड समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती प्रमुख कार्यकर्ते अंकुश भोसले यांनी दिली.

हे कार्यकर्ते होते उपस्थित:आमदार साहेबांचे आभार मानण्यासाठी आणि मागण्यांचे निवेदन देण्यासाठी अमित काळे, हर्षद चव्हाण, सचिन भोसले, शेखर चव्हाण, प्रीतम भोसले, शरद भोसले, राकेश चव्हाण, किशोर भोसले, छबू पवार, शुभम भोसले, सौरभ भोसले यांच्यासह आदिवासी पारधी समाजाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी, तरुण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.