Uncategorized

प्रतिकूलतेवर मात करत फलटणची चिमुरडी चमकली!

‘इस्रो’ अवकाश प्रदर्शन परीक्षेत कुमारी आरोही नरगाळे राज्यात पहिली

​इंग्रजी माध्यमातून १०० पैकी ८३ गुण मिळवून पटकावला बहुमान!​

बेंगलोर येथील ‘इस्रो’ (ISRO) प्रदर्शनासाठी झाली निवड; शास्त्रज्ञ होण्याचा निर्धार.

हिप्पारगा रवा प्रतिनिधी दि. १० : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, हे फलटणमधील एका चिमुरडीने सिद्ध करून दाखवले आहे. डायमंड टॅलेंट सर्च परीक्षा २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय इस्रो (ISRO) अवकाश प्रदर्शन भेट परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी (फलटण) येथील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कुमारी आरोही आनंद नरगाळे हिने इंग्रजी माध्यमातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.​

या अत्यंत प्रतिष्ठेच्या परीक्षेत आरोहीने १०० पैकी तब्बल ८३ गुण मिळवत हे यश खेचून आणले. या यशाबद्दल तिची बेंगलोर येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) अवकाश प्रदर्शनाला भेट देण्यासाठी (व्हिजिट) विशेष निवड झाली आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे फलटणसह संपूर्ण सातारा आणि धाराशिव जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.​

बेताची परिस्थिती, पण स्वप्ने गगनभरारीची!​

आरोहीचे मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) हे आहे. तिचे वडील रोजगारानिमित्त फलटण येथे नोकरी करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही, आरोहीने अभ्यासात अजिबात कसर सोडली नाही. कोणत्याही सुविधांचा अभाव आडवा येऊ न देता, तिने केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर राज्यात पहिला क्रमांक मिळवण्याचा बहुमान मिळवला.

​”माझ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी भविष्यात शास्त्रज्ञ (Scientist) बनणार!” — कुमारी आरोही नरगाळे (राज्य प्रथम क्रमांक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button