Uncategorized

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे उद्या शाळांना सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश!

​पिंपरी प्रतिनिधी दि. ६ : भारतीय हवामान खात्याने पुणे जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिल्याने, सुरक्षेचा उपाय म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवार, दिनांक ०६ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी रविवारी (५ जुलै) संध्याकाळी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.

​घाट क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ​

कोणत्या शाळांना सुट्टी लागू?​जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील खालील सर्व शाळा बंद राहतील:

​सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, ​जिल्हा परिषद, नगरपालिका व आश्रमशाळा ​सर्व खाजगी, अनुदानित व विनाअनुदानित शाळा ​इंग्लिश मीडियमच्या शाळा आणि सर्व अंगणवाड्या ​

शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना:​विद्यार्थ्यांना सुट्टी असली तरी सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार त्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे लागणार आहे. ​

नागरिकांना आवाहन:​”नागरिकांनी योग्य ती दक्षता बाळगावी आणि अत्यंत आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button