Uncategorized

बार्शी नगरपालिका निवडणुकीत सौ. मीरा नाळे बिनविरोध

बार्शी २६:(एच आर न्यूज मराठी )नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना, आज अचानकपणे प्रभाग क्रमांक 7 ब मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाच्या उमेदवार निवेदिता जीवनदत्त आरगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे या ठिकाणी त्यांच्याविरुद्ध उभ्या असलेल्या शिवसेनेच्या (शिंदे गट) मीरा शितल नाळे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.नगरपरिषद निवडणुकीच्या 21 नोव्हेंबर रोजीच्या अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर, ज्या उमेदवारांच्या हरकती आहेत आणि कोर्टात अपील परिस्थिती आहे अशा उमेदवारांसाठी अर्ज माघार घेण्याची मुदत 25 नोव्हेंबर होती.शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मीरा शितल नाळे यांची थेट दुरंगी लढत असलेल्या विरोधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या उमेदवार निवेदिता आरगडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत, सूचकाच्या खोट्या सही असल्याचा दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल येण्याआधीच आज निवेदिता आरगडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला. यामुळे शिवसेनेच्या सौ. मिरा शितल नाळे या बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. बार्शी नगरपालिकेत ३४ वर्षानंतर बिनविरोध झालेल्या त्या नगरसेविका आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button