समाजासाठी विविध उपक्रम राबवणारे कार्यकर्ते दत्तात्रय महादेव गुरव

बार्शी २(प्रतिनिधी):(एच आर न्यूज मराठी)सामाजिक कार्याच्या क्षेत्रात स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे दत्तात्रय महादेव गुरव हे रक्तदान, शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी सातत्याने झटणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. गेल्या सात वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागात रक्तदान शिबिरांचे नियमित आयोजन केले असून अनेक तरुणांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देण्याच्या या कार्याचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.याशिवाय, गुरव यांनी शैक्षणिक क्षेत्रातील गरज ओळखून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, मतिमंद व मुखाबधिर शाळांमध्ये अन्न व खाऊ वाटप, तसेच विविध जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन व बक्षीस वितरण अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन दिले आहे.सामाजिक न्यायासाठी ठाम भूमिका घेणारे गुरव हे अन्यायाविरुद्ध निडरपणे लढणारे आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी आवाज उठवणारे कार्यकर्ते आहेत. स्थानिक गुंडगिरी, गैरव्यवहार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांनी केलेले संघर्षमय प्रयत्न आजही अनेकांसाठी प्रेरणादायी

ठरतात.पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे बार्शी तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक नागरिकांच्या समस्या समोर आणल्या असून विवेक न्यूजच्या माध्यमातून त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. अलीकडेच त्यांची सोलापूर जिल्हा व्हॉइस प्रेसिडेंट पदावर निवड झाली असून त्यांच्या कार्याची दखल म्हणून जिल्हा पातळीवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.एकूणच, रक्तदान, शैक्षणिक मदत, विद्यार्थ्यांसाठी उपक्रम, सामाजिक न्यायाची लढाई आणि ग्रामीण पत्रकारितेतून जनतेच्या समस्या मांडणे—या सर्व क्षेत्रांतून कार्य करणारे दत्तात्रय महादेव गुरव हे समाजासाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.