ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली धर्मवीर जाधव यांचा उपक्रम; निर्धार कुटुंबाला उपजीविकेसाठी शेळी प्रदान

गरजू कुटुंबाला स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत
|लोहारा प्रतिनिधी |२८ गावातील सामाजिक बांधिलकी जपत ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपाली धर्मवीर जाधव यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवित निर्धार कुटुंबाला उपजीविकेसाठी एक शेळी प्रदान केली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने त्यांनी हा पुढाकार घेतला.
या उपक्रमामुळे संबंधित कुटुंबाला शेळीपालनाच्या माध्यमातून नियमित उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार असून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गावातील नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत सौ. जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी सौ. जाधव यांनी सांगितले की, “गरजू कुटुंबांना मदत करून त्यांना स्वावलंबी बनविणे हीच खरी सामाजिक सेवा आहे. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा माझा प्रयत्न राहील.”
या उपक्रमामुळे गावात सामाजिक एकात्मता वाढीस लागून इतरांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.