जळोजी मळोजी महाराज यांचा आज पौष कृष्ण पंचमी पुण्यस्मरण दिवस निमित्त विनम्र अभिवादन.

पिंपरी प्रतिनिधी ७: संतबंधूंचा समाधी स्थळाची माहिती व आपण ती समाधी स्थळापर्यंत कसे पोहोचता यावे समाधी स्थळाचे दर्शन सर्व समाज बांधवांना घेता यावे हेतूने आपल्यापर्यंत पोहोचत आहे.
संतबंधू जळोजी मळोजी महाराज हे सुतार समाजात जन्माला आलेले थोर बंधू होय दोन्ही बंधू चे मुळगाव हंडरगुळी .ता उदागीर.जि.लातुर. या संत बंधूंची यांचे समाधी स्थान श्री क्षेत्र पंढरपूर इथे आहे
संतश्रेष्ठ जळोजी महाराज यांचे समाधी स्थान हे श्री हरी विठ्ठल मंदिरात प्रवेश करताना नामदेव पायरी कडून सभा मंडपात प्रवेश दारा जवळ उजव्या हाताला आहे तरी पांडुरंगाच्या समोर आहे संतश्रेष्ठ श्री मळोजी महाराज यांच्या समाधी स्थान चंद्रभागे तिरी श्री पुंडलिक मंदिराच्या बाजूला लोहतीर्थ च्या समोर आहे या संत बंधूंची एकच दिवशी पुण्यतिथी येते
दोघे बंधूंचा एकमेकावर अतुटअसे प्रेम होते दोघं बंधूनी एकाच दिवशी देहत्याग केला. अशा या आपल्या समाजाची थोर संत बंधू ची समाधी दर्शन घेऊन नतमस्तक व्हावं अशी सर्व समजल बांधवांना विनंती.व श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री विश्वकर्मा मंदिर व संत बंधू जळोजी मळोजी महाराज मठ आहे ठिकाण संत पीठ सांगोला रोड पंढरपूर ह.भ.प. उदय भाऊ पगारे नामपूर