Uncategorized

सामाजिक सेवेच्या गौरवासाठी दत्तात्रय महादेव गुरव यांना ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार’

बार्शी ७ | प्रतिनिधीसमाजकल्याण, सामाजिक जबाबदारी व मानवतावादी कार्यात सातत्याने भरीव योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय महादेव गुरव यांना Worthy Wellness Foundation (Regd.) यांच्या वतीने ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.२०१९ साली शिवजयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिरांची सुरुवात करून गुरव यांनी समाजोपयोगी कार्याची ठोस पायाभरणी केली. त्यानंतर विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून नियमितपणे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली. याच उपक्रमांतर्गत २०२५ मधील श्री रामलिंग यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर हे नववे शिबिर ठरले असून या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल.

विशेष बाब म्हणजे २०१९ पासून गरीब व गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात रक्त उपलब्ध करून देण्याचे कार्य गुरव यांच्या पुढाकारातून अखंडपणे सुरू आहे. या उपक्रमामुळे अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाले असून, अनेकांचे प्राण वाचण्यास मोलाची मदत झाली आहे. समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी केलेल्या या निस्वार्थ सेवेबद्दल गुरव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि लोकहिताच्या कार्यातून समाजाला दिशा देणारे गुरव यांचे कार्य प्रेरणादायी ठरत असून, त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button