दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कार्यकाळ वर्षपूर्ती निमित्त बातम्यांच्या चित्र प्रदर्शनाचा सोहळा संपन्न


प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षपूर्ती निमित्त स्टेप्स फाउंडेशन आयोजित बातम्या व छायाचित्रांच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकशाहीचा चौथा स्तंभ नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यावर आधारित बातम्या छायाचित्रांचे प्रदर्शन संपन्न
प्रतिनिधी:६ (एच आर न्यूज मराठी पिंपरी चिंचवड, : “आपला आदर्श, आपली प्रेरणा, नवमहाराष्ट्र निर्माण संकल्पना” या विचारांवर आधारित सर्वस्पर्शी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्याच्या , विद्यमान सरकार मधील वर्षपूर्ती निमित्त, “लोकशाहीचा चौथा स्तंभ” असलेल्या नामांकित वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन चिंचवड येथे दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाले. दिनांक ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रक्रेक्षागृह आर्ट गॅलरी चिंचवड येथे पंकज भोयर ( मंत्री, महाराष्ट्र राज्य), यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी अनुसूचित जाती/जमाती आयोगाचे सदस्य गोरक्ष लोखंडे, गजानन जोशी (मुख्य संयोजक: देवाभाऊ फांऊडेशन, महाराष्ट्र राज्य), विश्वजीत देशपांडे (प्रदेशाध्यक्ष: परशुराम हिंदू सेवा संघ, महाराष्ट्र) यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कर्तृत्ववान मुख्यमंत्री, गतिमान शासन व निर्णय अंमलबजावणी झालेल्या या मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळावा हा कार्यक्रम घेण्यापाठीमागे निष्पक्ष हेतू आहे असे मुख्य आयोजक नितीन चिलवंत यांनी सांगून सुरूवातीला मंत्री महोदयांच्या हस्ते गोमातेचे पूजन करून प्रदर्शनाची सुरुवात झाली. निमंत्रक व स्टेप्स फाउंडेशन चे संदेश मुखेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुसज्ज नियोजन केले होते

त्याचा दर्शक आणि मान्यवरांनी अनुभव घेतला.यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की, “प्रथमच पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरामध्ये अशापद्दतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्य कर्तृत्वाचा गौरव प्रकाशित झालेल्या बातम्यांचे चित्र प्रदर्शन आयोजित करून ते सर्वासाठी खुले केल्याबद्दल स्टेप्स फाउंडेशनचे आणि संपुर्ण टीमचे कौतुक. असे कार्यक्रम प्रत्येक जिह्यात झाले पाहिजेत जेणेकरून कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्यांच्या कार्याला उजाळा मिळेल” गोरक्ष लोखंडे (अनुसूचित जाती/जमाती आयोग सदस्य, सचिव दर्जा) यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “या चित्र प्रदर्शनातील सर्वात जास्त आवडलेला फोटो म्हणजे, माझ्या राज्यातील गरीब आणि शेवटचे घर जोपर्यंत सुखी नाही ते राज्य सुखी नाही! असा विचार करून रयत सुखी ठेवण्यासाठी कार्य करणारे मराठी मनाचा मानबिंदू या मातीने आम्हाला दिला, असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतानाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे चित्र जास्त भावले” स्टेप्स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या महाराष्ट्राचे प्रभावशाली मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वर्षभरातील कार्यकाळातील विकासकामांचा सर्वांगीण आढावा सादर करणाऱ्या विशेष विकास प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि सामन्य नागरिकांनी घेतला. प्रदर्शनामध्ये महत्त्वपूर्ण प्रकल्पांचा, निर्णयांचा आणि जनकल्याणकारी उपक्रमांचा दस्तऐवजी स्वरूपात व्यापक परिचय यामधून दर्शकांना झाला. दर्शकांसाठी हे केवळ चित्र प्रदर्शन नव्हे तर ज्ञानदर्शन होते अशी भावना काही उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली. असे हे अनोखे आणि प्रेरणादायी चित्र प्रदर्शन सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी दिवसभर सुरू होते.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्ष आणि संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी, व सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यामध्ये राज्य मंत्री पंकज भोयर यांच्या सह गोरक्ष लोखंडे (सचिव दर्जा, सदस्य : अनुसूचित जाती जमाती आयोग), अमेय जोशी, जागृती धर्माधिकारी, निलेश नेवाळे, तुषार हिंगे, दिपाली जोशी, संदीप पोलकम, मुकुंद घोलप, प्रवीण शेलार, संदीप मोरे, अजिंक्य पोतदार, सचिन बंदी (सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर), कैलास कुटे (अध्यक्ष भाजपा पिंपरी विधानसभा), केतकी कुलकर्णी, एम. वेंकटेश, दिनेश यादव, सुप्रिया चांदगुडे, मुक्ता पुंडे, राहुल अग्रवाल, जयदीप खापरे, संदीप थोरात, अरुण पाडुळे, विशाल लोखंडे, काशिनाथ ठाकूर, संदीप चव्हाण, प्रदीप रॉय, रेशु अग्रवाल,भक्ती मुखेडकर, रेश्मा चिलवंत, अश्विन गुडसूरकर, भूषण तरकसे, लिओन कुटीनो, व्यंकटेश सोमवंशी, विजय चव्हाण, भावना नर्सिंगोजू , शिवकुमारसिंह बायस, धनंजय गावडे,सतीश सिल्म, ओंकार शिकारे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन साळी यांनी केले.