Uncategorized

“जमिनीच्या फसवणुकीला कंटाळून शेतकरी पत्रकार परिषदेत; न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर आत्मदहनाचा इशारा”

“न्यायालयीन आदेश झुगारून सदनिका विक्रीचा आरोप; बेग–शेख कुटुंबावर ४०० गुंडांचा हल्ला”

पुणे प्रतिनिधी ता.२ – जमिनीच्या फसवणूकप्रकरणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पीडित बेग व शेख कुटुंबाने अखेर लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांकडे न्याय मागितला आहे. श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत शेतकरी आरीफ कासम बेग, राजाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे, वकील ताहीर खान फिरोज बेग व आसिफ शेख उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी गोयल गंगा डेव्हलपर्सचे वकील सचिन भालेराव यांनी पत्रकार परिषद घेऊन समाजमाध्यमांवर दिशाभूल केल्याचा आरोप करत, त्याच पार्श्वभूमीवर बेग व शेख कुटुंबाने पत्रकारांशी संवाद साधला. खराडी (ता. हवेली) येथील सर्व्हे नंबर २२/२ मधील सुमारे ४ हेक्टर १० आर वडिलोपार्जित जमिनीपैकी १२५.५ आर व २४ आर जमीन सन २००६ मध्ये काही अटी व शर्तींवर, केवळ विकासासाठी व तेही १८ महिन्यांच्या मुदतीवर गोयल गंगा डेव्हलपर्सला देण्यात आली होती. मात्र जयप्रकाश गोयल, अतुल गोयल व अमित गोयल यांनी आमची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप कुटुंबाने केला आहे.या जमिनीवर न्यायालयाचा आदेश असतानाही बेकायदेशीरपणे सदनिका विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

याविरोधात आवाज उठवल्यानंतर ३ मे २०२१ रोजी तब्बल २०० ते ४०० गुंडांच्या जमावाने प्राणघातक हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कोरोना काळात जमावबंदी लागू असतानाही हा हल्ला झाला, मात्र पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ पुरावे पत्रकार परिषदेत दाखवण्यात आले.चंदननगर व खराडी पोलीस स्टेशन, पुणे महानगरपालिका तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकारी दोषींनाच पाठीशी घालत असल्याचा आरोप करण्यात आला. न्याय न मिळाल्यास मंत्रालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला

“

सामान्य माणूसही न्यायालयात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल” – प्रभा करपेसामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे म्हणाल्या की, सदर प्रकरण अत्यंत गंभीर असून सरकारने तातडीने लक्ष घालावे. न्यायालयाचा आदेश धुडकावून लावला जात असेल तर सामान्य माणूस न्यायालयात जाण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल. या कुटुंबांना न्याय मिळावा, हीच अपेक्षा आहे.पत्रकार परिषदेत आरीफ कासम बेग, राजाभाऊ चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे, वकील ताहीर खान फिरोज बेग, आसिफ शेख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button