Uncategorized
चिंचवड मध्ये भीषण आग!

चिंचवडमध्ये भीषण आग; दुकान भस्मसात, सुदैवाने जीवितहानी नाही
पिंपरी प्रतिनिधी ता.१६ : चिंचवड येथील भटनगरजवळील लिंकरोड परिसरात एका दुकानाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीचे तांडव इतके तीव्र होते की संबंधित दुकान पूर्णपणे जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच

अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
