Uncategorized

प्रतीवर्षीप्रमाणे कल्याण स्वामी मठ संस्थानची गड प्रदक्षिणा संपन्न

oplus_0

सातारा प्रतिनिधी दि.१७ प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही कल्याण स्वामी मठ संस्थान चे मठपती व समर्थ भक्तांच्या उपस्थितीत सज्जनगड येथील पारंपरिक गड प्रदक्षिणा भक्तीभावात व शिस्तबद्ध पद्धतीने संपन्न झाली.महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच भक्तांनी हर-हर महादेव व जय जय रामकृष्ण हरि जयघोषात प्रदक्षिणेस प्रारंभ केला. मार्गावर नामस्मरण, भजन-कीर्तन व सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या. मठपतींच्या मार्गदर्शनाखाली समर्थ भक्तांनी उपवास, सेवा व साधना करत प्रदक्षिणा पूर्ण केली.प्रदक्षिणेदरम्यान स्वयंसेवकांनी पाणी, प्राथमिक उपचार व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळली. कोणतीही अनुचित घटना न घडता हा धार्मिक उपक्रम शांततेत पार पडला. या वार्षिक गड प्रदक्षिणेमुळे समर्थ संप्रदायाची परंपरा अधिक दृढ होत असून भक्तांमध्ये अध्यात्मिक उत्साह संचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button