डीपीजीयूमध्ये जागतिक दर्जाची क्युलिनरी मास्टरक्लास — शेफ सुमंत शर्मांच्या मार्गदर्शनाखाली ‘इननोव्हेटिव्ह इंडियन स्वीट्स’चा अनोखा अनुभव

पुणे | प्रतिनिधी 25 फेब्रुवारी : Dnyaan Prasad Global University (DPGU) येथे Dr. D.Y. Patil Unitech Society यांच्या वतीने दोन दिवसांची विशेष क्युलिनरी मास्टरक्लास यशस्वीपणे पार पडली. ही कार्यशाळा Chef Sumant Sharma, Executive Pastry Chef – Musaafer यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली.
“Innovative Indian Sweets and Confection” या विषयावर आधारित या मास्टरक्लासमध्ये हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या तंत्रांचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला. आधुनिक प्लेटिंग शैली, नाविन्यपूर्ण भारतीय मिठाई व कन्फेक्शनरीचे ट्रेंड्स, तसेच मिशेलिन-स्टार दर्जाच्या किचन स्टँडर्ड्स यांचा समावेश प्रशिक्षणात करण्यात आला.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योगाशी थेट जोडलेले कौशल्य प्रशिक्षण मिळाले असून, DPGU च्या industry-led आणि experiential hospitality education या दृष्टिकोनाला अधिक बळ मिळाले आहे. Pune येथे दर्जेदार, व्यावसायिकाभिमुख हॉस्पिटॅलिटी शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.