Uncategorized

डी. वाय. पाटील ॲनिमेशन विभागातील विद्यार्थ्यांचा संवर्धन उपक्रम

डी. वाय. पाटील ॲनिमेशन विभागातील विद्यार्थ्यांचा संवर्धन उपक्रम

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी ६ : डॉ. डी. वाय. पाटील संस्थेच्या ॲनिमेशन विभागातील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी विशेष उपक्रम राबवत आपले सामाजिक भान जपले. विभागाचे मार्गदर्शक एच. डी. प्रसाद शुक्ला सर तसेच शिक्षिका अनघा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे संवर्धनाचा संदेश दिला.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी मनापासून परिश्रम घेतले. यात आयुष पांडे, अपूर्वा जाधव, शरद काळे, यश कदम, ओम नायडू, शेख शुभम, सोनार शुभम पाटील, दिव्या मिस्त्री आणि सोहम काळे या विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.मार्गदर्शक शिक्षकांच्या प्रेरणेमुळे विद्यार्थ्यांनी संवर्धनाचे महत्त्व समजून घेत समाजात सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button