दापोडीत गुन्हे शाखेची मोठी कारवाई
१० लाख ८५ हजारांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त, दोघे जेरबंद!
दापोडी प्रतिनिधी २८ : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti-Narcotics Cell) दापोडीत जुना पुणे-मुंबई हायवे सर्व्हिस रोडवर सापळा रचून एका मोठ्या ड्रग्ज तस्कराचा डाव उधळून लावला आहे.
अटक आरोपी: १) आर्यन रविंद्र यादव (वय २० वर्षे, रा. न्यू मोदीखाना कॅम्प, पुणे)
२) शोएब शकील शेख उर्फ वस्ताद (वय २५ वर्षे, रा. रविवार पेठ, पुणे)
जप्त मुद्देमाल: १०,८५,६००/- रुपये किमतीचे एकूण ९८.५६ ग्रॅम ‘एमडी’ (मेफेड्रोन) अंमली पदार्थ, १ दुचाकी आणि १ मोबाईल.
नेमकी कारवाई कशी झाली? अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस शिपाई रणधिर माने यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दापोडीतील एमएनजीएल सीएनजी पंपाशेजारी, सुदामाचे पोहे हॉटेलसमोर दोन इसम ड्रग्ज विक्रीसाठी येणार होते. पोलिसांनी दबा धरून आरोपी आर्यन यादव याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १० लाख ८५ हजारांचे ‘एमडी’ सापडले. आरोपीकडे कसून चौकशी केली असता, हे ड्रग्ज त्याने रविवार पेठेतील शोएब शकील शेख उर्फ वस्ताद याच्याकडून विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
दापोडी पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. ऍक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम तपास करत आहेत.