महिला दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा खास सांस्कृतिक कार्यक्रम; महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – राणीमाई पठारे

पिंपरी प्रतिनिधी १२ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक १६ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम, कलाविष्कार आणि महिलांच्या प्रतिभेला वाव देणारे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांनी केले आहे.महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे शहरातील महिलांना एकत्र येऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण करण्याची संधी मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.