राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

पिंपरी प्रतिनिधी :आज गुरुवार, दिनांक १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी च्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, स्व. यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी औद्योगिक विकासाच्या योजना आखताना अविकसित भागांचा प्राधान्याने विचार केला. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती व उद्योग यांची सांगड घालत त्यांनी शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली. महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी महिला अध्यक्षा कविता आल्हाट व माजी नगरसेविका सीमा सावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले.

या जयंती कार्यक्रमास शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्वला ढोरे, दिप्ती कांबळे, वर्षा जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, शेरबहादुर खत्री, शक्रुल्ला पठाण, अकबर मुल्ला, संपतराव पाचुंदकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, बाबासाहेब चौधरी, सरचिटणीस सुरेंद्रसिंग बाला, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल प्रदीप आवटी, कोमल कवडे, सरचिटणीस बापू सोनवणे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष कुमार कांबळे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.