कुर्डुवाडी येथील मतिमंद निवासी शाळेत विवेक सेवाभावी संस्थेकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप

बार्शी प्रतिनिधी १६ : विवेक सेवाभावी संस्था, भोईंजे (ता. बार्शी) यांच्या वतीने कुर्डुवाडी (ता. माढा) येथील मतिमंद निवासी शाळेला भेट देऊन शाळेतील बौद्धिक अपंग (दिव्यांग) विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.दि. १४ मार्च २०२६ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय महादेव गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना खाऊ वाटप करण्यात आले तसेच शाळेतील विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत माहिती घेण्यात आली.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. चंद्रकांत बेडके सर, स्टाफमधील रुकसाना शेख, कोल्हाळे सर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी विवेक सेवाभावी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. यावेळी शाळेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय महादेव गुरव यांचा सन्मान करून आभारपत्र देण्यात आले.भविष्यातही अशा सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शाळेच्या वतीने विवेक सेवाभावी संस्थेचे आभार मानण्यात आले.