Uncategorized

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत प्रसिद्ध केला विकासाचा अजेंडा!

oplus_2097152

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी ११ :पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 व 26 च्या अनुषंगाने सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना आज वल्लभनगर येथे कलासागर हॉटेलमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन विकासाचा अजेंडा पत्रकारांच्या समोर प्रसिद्ध केला यामध्ये दोन्हीही राष्ट्रवादी मिळून या पिंपरी चिंचवड चा कायापालट करून दाखवू व याआधी सुद्धा या पिंपरी चिंचवड चा विकास हा आम्हीच केला आहे अशा ठाम शब्दात अजित पवारांनी सांगितले मेट्रो पीसीएमसी बस या पिंपरी चिंचवडकरांसाठी मोफत सुविधा देण्याचे वचनही काही देशाचे नाव घेऊन उदाहरणा सहित त्या ठिकाणी दादा नी पिंपरी चिंचवडकराना दिले तसेच दररोज नित्य नियमाने शुद्ध पाणी सुसज्ज रस्ते व वाय सी एम च्या शेजारीच सुसज्ज असे अत्यावत दहा मजली इतकी मोठी आवश्यक असणाऱ्या हायटेक मशनरी असलेले सुसज्ज हॉस्पिटल उपलब्ध करून देण्याचे दादांनी सांगितले पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आमदार अण्णा बनसोडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष योगेश जी बहल आमदार रोहित पवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे गोरख लोखंडे अजित गव्हाणे माजी शहराध्यक्ष तुषार कामठे भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button