Uncategorized

दिल्लीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पोलिसांची दक्षता

दिल्लीच्या स्फोटाची पार्श्वभूमी : अक्कलकोट शहरात नाकाबंदी, स्वामी समर्थांच्या मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणेचा कडेकोट बंदोबस्त

पंढरपूर : (HRNM)देशाच्या राजधानी असलेल्यादिल्लीतील लाल किल्ला जवळील मेट्रो स्टेशन जवळ सोमवारी गर्दीच्या वेळी कारचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये अनेक जण ठार व जखमी झाले आहेत. यामुळे देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणाला हाय अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे पंढरपुरात देखील विठ्ठल मंदिर परिसरात शस्त्रधारक पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे. महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखले जाते. या पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविकांची गर्दी होत असते.त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात कोणतीही अतिरेकी कारवाई होण्याची शक्यता असते.यामुळे पोलिस प्रशासनाने मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. मंदिरात जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून तपासणी केली जात आहे. संशयित वस्तूची देखील बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. तसेच भाविकांच्या साहित्याचे मेटल डिटेक्टरच्या साह्याने तपासणी होत आहे. त्याचबरोबर मंदिरात प्रवेश करणारे द्वारावर शस्त्रधारी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर चौकाचौकात सीआरपी पथक नेमण्यात आले असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.दोन वेळा बॉम्बशोधक पथकाकडून तपासणीश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, दर्शन रांग, दर्शन मंडप, चौफळा, महाद्वार चौक, वाळवंट आदी परिसरात बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी होत आहे. त्याचबरोबर वरील परिसराचे डॉग स्कॉडद्वारे संशयित वस्तूंची तपासणी होत आहे.शहरात नाकाबंदीपंढरपूर शहरात प्रवेश होणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावरील चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच रात्रीदेखील नाकाबंदी करण्यात आली आहे.अक्कलकोटमध्ये नाकाबंदी; कसून तपासणी मोहीम..१ दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरात सुरक्षा वाढविली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला गेला आहे. शिवाय शहराच्या परिसरात नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे.अक्कलकोट ते सोलापूर २ रस्त्यावर ब्रीजखाली, अक्कलकोट ते वागदरी रोडवरील ब्रीजखाली, अक्कलकोट हन्नूर रोडवरील ब्रीज येथे नाकाबंदीकरण्यात आली आहे. प्रत्येकवाहनांची पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. तसेच स्वामी समर्थ मंदिरात एक पोलिस अधिकारी, ९ पोलिस कर्मचारी बंदोबस्ताला आहेत. मंदिरात तपासूनच सोडण्यात येत आहे. भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.पोलिस अधीक्षक अतुल 3 कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावर, पोलिस निरीक्षक दीपकभिताडे, सपोनि. नीलेश बागाव, पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही मोहीम सुरू असणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.मंदिर समितीच्या ४ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. यासाठी पोलिस मुख्यालयाकडून अतिरिक्त पोलिसांची तुकडी मागविण्यात आ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button