Uncategorized
श्री ग्यानबा सोपानराव मोझे शाळेच्या पुढाकाराने शिवजन्मोत्सव रॅली उत्साहात संपन्न

भोसरी प्रतिनिधी १९: शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने श्री ग्यानबा सोपानराव मोझे शाळेने यांच्या पुढाकाराने भव्य आणि शिस्तबद्ध शिवजन्मोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.रॅलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांचा निनाद, भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि प्रेरणादायी घोषणांमुळे संपूर्ण वातावरण शिवमय झाले होते.युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवाजी महाराजांचे विचार, स्वराज्याची संकल्पना आणि सामाजिक ऐक्याचा संदेश या रॅलीतून देण्यात आला. रॅली शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. नागरिकांनी या उपक्रमाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.