चिंचवडमध्ये ‘रणरागिणी’चा भव्य सन्मान; पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात

महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; काव्य मैफिलीने रंगत वाढली
पिंपरी-चिंचवड : जागतिक महिला दिनाच्या औचित्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई संलग्न पिंपरी चिंचवड पत्रकार संघ व डिजिटल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने “पुरस्कार वितरण सोहळा २०२६” आणि कर्तृत्ववान ‘रणरागिणी’ंचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला .
हा कार्यक्रम रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता सायन्स पार्क सभागृह, चिंचवड येथे पार पडला .या सोहळ्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री. रविभाऊ लांडगे, उपमहापौर सौ. शर्मिला बाबर यांची प्रमुख उपस्थिती लाभली . मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त शरद पाबळे आणि राज्य उपाध्यक्ष गणेश मोकाशे उपस्थित होते.
कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला असून, त्यामध्ये प्रख्यात टॉक्सीकॉलॉजिस्ट डॉ. किशोरी आपटे, आदर्श माता म्हणून सुभदा आत्माराम मोकाशे, सामाजिक क्षेत्रातील सुप्रिया सचिन मंडलिक, सांस्कृतिक क्षेत्रातील स्वरांजली माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा बोंबले, तसेच कला, संगीत, नाट्य व सिनेमा क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा समावेश होता.
याशिवाय रुग्णसेवा क्षेत्रातील स्वाती कुलकर्णी, शोभा तळेकर आणि शोभा ढोले यांचा विशेष सन्मान करण्यात आला.सोहळ्याचे आणखी एक आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेली काव्य मैफिल. जेष्ठ कवी-गीतकार प्रकाश गायकवाड, हास्यकवी देवेंद्र गावंडे आणि कवयित्री प्रा. सुषमा भालेराव यांनी आपल्या काव्यरचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे काव्य संचालन राजेंद्र सगर व डिजिटल मीडिया अध्यक्ष वीनय सोनवणे यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष सागर गोपाळ सूर्यवंशी व डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष विनय दत्तू सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

या कार्यक्रमास माऊली भोसले,संतोष गोतावळे,महावीर जाधव,सिद्दान्त चौधरी,हनुमंत रामदासी,किशोर लष्करे, रमेश साठे,अनिल वडघुले,चिराग फुलसुंदर,नरेशभाई जिनावल,अशोक कोकणे डॉक्टर,शेलार पत्रकार न्यायाधीश इत्यादी पत्रकार व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्तीथी दर्शवली.