Uncategorized

सलगरा बु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात; अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सलगरा बु ता. १४ – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सलगरा बु येथे अभिमान व उत्साहाच्या वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी गावाच्या सरपंच शांताबाई साळुंके यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील प्रमुख मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, सामाजिक न्याय, समानता व बंधुता या मूल्यांच्या जपणुकीचा निर्धार व्यक्त केला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही समाजासाठी मार्गदर्शक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.कार्यक्रमामुळे संपूर्ण गावात प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जयंतीला वेगळे स्वरूप प्राप्त झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button